Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राष्ट्रवादी पुन्हा एकत्र?; महापालिकेसाठी दोन्ही गटांमध्ये सकारात्मक चर्चा
    राजकारण

    राष्ट्रवादी पुन्हा एकत्र?; महापालिकेसाठी दोन्ही गटांमध्ये सकारात्मक चर्चा

    editor deskBy editor deskDecember 23, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : प्रतिनिधी

    पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला असून, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत.

    भाजपविरोधात ताकद एकवटण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आज उशिरा महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत पुणे महापालिकेसाठी जागावाटप, निवडणूक रणनीती आणि एकत्र लढण्याचा आराखडा ठरवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

    दरम्यान, आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ॲड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे, विशाल तांबे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप सहभागी झाले होते. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट झाले असून, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढल्यास कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला नसून, मुंबईत असल्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित राहिले. मात्र, ते पक्षासोबतच राहतील, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला आहे.

    पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाकडून ठाकरे गटालाही सोबत घेण्याचा प्रस्ताव अजित पवार यांच्यासमोर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    दरम्यान, या संभाव्य युतीमुळे शरद पवार गटातच अस्वस्थता निर्माण झाली असून, अंतर्गत नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या भूमिकेचा वरिष्ठ नेतृत्वावर फारसा परिणाम झाल्याचे दिसत नसून, पुण्यात दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये गुप्त बैठकाही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

    या स्थानिक पातळीवरील चर्चेनंतर पुणे महापालिका निवडणूक आणि पुढील राजकीय दिशा याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला जाणार असल्याचे समजते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कोणती नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाल्मिक कराडसह आरोपींवर आरोप निश्चित; पुढील सुनावणी ८ जानेवारीला

    December 23, 2025

    जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जांना गर्दी

    December 23, 2025

    राज–उद्धव ठाकरे यांची युती निश्चित; संजय राऊतांचे ट्वीट, उद्या घोषणा

    December 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.