Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskDecember 22, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या संजय श्रावण काळे (वय ५२, रा. कोठारी नगर, हरिविठ्ठल नगर) यांना धावत्या रेल्वेची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील टॉवरसमोरील रेल्वे रुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कोठारी नगरात संजय श्रावण काळे हे वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे रविवार दि. २१ रोजी सकाळच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. यावेळी आशाबाबा नगरासमोरील टॉवरसमोरील खांबा क्रमांक ४१६/२४ दरम्यान, त्यांना धावत्या रेल्वेची धडक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती रामानंद नगर पोलीसांना मिळताच पोहेकॉ अजित पाटील व निलेश पाटील यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. अश्विन देवचे यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.