अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार ६ जुलै रोजी अल्पवयीन मुलीचे पालक हे शेतात कामासाठी गेले. त्यावेळी मुलगी घरी एकटी होती. सायंकाळी तिचे पालक घरी आल्यावर मुलगी घरी दिसून आली नाही. त्यांनी गावात आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला परंतू मुलगी कुठेही आढळून आली नाही. दरम्यान, मुलीच्या पालकांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहे.


