Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेडवर काम करताना काळाचा घाला; ४५ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी अंत
    क्राईम

    शेडवर काम करताना काळाचा घाला; ४५ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी अंत

    editor deskBy editor deskDecember 20, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील केऱ्हाळे बु. येथे पत्र्याच्या शेडवर काम करत असताना खाली पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, केऱ्हाळे बु. येथील एकता नगर परिसरात शिवम बाजीराव पाटील यांच्या घराच्या पत्र्याच्या शेडवर काम सुरू असताना विजय दत्तात्रय पाटील (वय ४५, रा. केऱ्हाळे बु., ता. रावेर) हे अचानक शेडवरून खाली कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रद्युम्न महाजन यांनी त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले.

    ही घटना गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रवींद्र भिका पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, पुढील तपास हे.कॉ. योगेश महाजन करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.