जळगाव : विजय पाटील
महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून विविध पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व त्याच्याकडून अर्ज भरून घेत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पार्टी कडून सर्वात जास्त इच्छुक उमेदवार असून महायुती झाल्यास भाजप व शिवसेना शिंदे गट हे दोन्ही मित्र पक्ष जागेचा तिढा कसा सोडवणार याकडे देखील लक्ष लागून असणार आहे. तर शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यातील काडीमोड झाल्याने व एम आय एम पक्ष देखील ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याने या प्रभागात निवडणुकीची चांगलीच रंगतदार लढती पहावयास मिळणार आहे.
गेल्या वेळी २०१८ च्या पंचवार्षिक निवडणुकीत चारही जागांवर भाजपचे उमेदवार येथे विजयी झाले होते; परंतु आता यातील तीन नगरसेवक शिवसेना (उबाठा), त्यानंतर शिवसेना असा त्यांचा प्रवास झाला आहे. त्यात भाजप व शिवसेना यांच्यात युती झाल्यास या चारही जागांवर शिवसेना दावेदारी करणार आहे. परंतु, भाजपातर्फ इच्छूक उमेदवारांची यादी मोठी असून भाजप देखील युती झाल्यावर तीन जागावर लढणार असून एक जागा शिंद सेनेला सोडण्याचे प्राथमिक नियोजन असल्याची माहिती समोर येत आहे.
केवळ १ नगरसेवक शिंदे गटात
मागील पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले होते. मातील केवळ अॅड. दिलीप पोकळे हे शिंदे सेना गटातून सध्या सक्रिय आहे. अन्य दोन माजी नगरसेविका सरिता नेरकर व प्रिया जोहरे या कोणत्या पक्षात दिसून येत नाही आहे. तसेच रुकसानाबी गबलू खान यांची देखील लढण्याची तयारी सुरू केली आहे.
जागा वाटपाचा तिढा वाढणार
महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदे सेना यांच्यात महायुती झाल्यास प्रभागात जागा वाटपाचा तिढा वाढणार आहे. शिंदे सेना गट चारही जागांवर आग्रही आहे. तर मागील निवडणुकीत भाजपच्या चार जागा निवडून आल्याने भाजप देखील चारही जागांवर दावेदारी करीत आहे.
इच्छुक उमेदवार..
माजी नगरसेवक दिलीप पोकळे, रुकसानाबी गबलू खान, यासह दोन अन्य शिंदे गटाकडून तर भाजपकडून संगीता पाटील, आनंद सपकाळे, फिरोज खान, संगीता दांडेकर, माजी नगरसेवक राजू मोरे हे राष्ट्रवादीचे असून ते राष्ट्रवादीकडून व शिवसेना उबाठा गटाकडून लढू शकतात. राष्ट्रवादी व एमआयएम कडूनही चारी जागांवर येथे उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या असल्याचे दिसून येत आहे.



