Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावात खळबळ : ९ वर्षीय बलिकेचा विहिरीत आढळला मृतदेह !
    क्राईम

    चाळीसगावात खळबळ : ९ वर्षीय बलिकेचा विहिरीत आढळला मृतदेह !

    editor deskBy editor deskDecember 16, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावातून शाळेतून घरी परतत असताना रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा मृतदेह तब्बल चार दिवसांच्या शोधानंतर गावालगतच्या एका विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुमारे ६० ते ७० तास चाललेल्या शोधमोहिमेचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला.

    धनश्री शिंदे ही गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तातडीने शोध सुरू केला. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी ती ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली होती. मात्र, त्यानंतर तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

    दरम्यान, शोधादरम्यान गावाबाहेरील शेतरस्त्यावर धनश्रीचे शालेय दप्तर आढळून आल्याने अपहरणाचा संशय अधिक बळावला होता. याप्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    सोमवारी (दि. १५) रोजी गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया तत्काळ राबवण्यात आली.

    धनश्रीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात आहे की घातपात, तसेच अपहरणानंतर तिला विहिरीत फेकण्यात आले का, या सर्व शक्यतांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धनश्रीच्या कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला असून तरवाडे बुद्रुक गावात नि:शब्द शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    जळगाव पोलीस कर्मचाऱ्याने चाळीसगावात संपविले आयुष्य !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.