Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रौढाची बँकेतच झाली फसवणूक; दोन अनोळखी तरुणांकडून लूट !
    क्राईम

    प्रौढाची बँकेतच झाली फसवणूक; दोन अनोळखी तरुणांकडून लूट !

    editor deskBy editor deskDecember 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या नागरिकाची हातचालाखीने फसवणूक केल्याची घटना जळगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत घडली आहे. पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी तरुणांनी १३ हजार रुपये लांबविल्याचा प्रकार २८ नोव्हेंबर रोजी घडला असून, याप्रकरणी १३ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मयूर कॉलनीतील रहिवासी सतीश दशरथ चौधरी (वय ५७) हे त्यांच्या मित्राच्या मुलीला ५० हजार रुपये पाठविण्यासाठी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत गेले होते. बँकेत स्लिप भरत असताना शेजारी बसलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. त्यानंतर चौधरी यांनी खिशातून ५० हजार रुपयांची रोकड काढली असता, दोघांनी ‘आम्ही पैसे मोजून देतो’ असे सांगत ती रक्कम त्यांच्या हातातून घेतली.

    या दोघांनी अर्धे-अर्धे पैसे वाटून घेत मोजल्याचा बनाव केला व चौधरी यांना परत देत ५० हजार रुपये असल्याचे सांगितले. मात्र, चौधरी यांनी कॅशिअरकडे पैसे जमा करताना त्यात १३ हजार रुपये कमी असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी दोघा तरुणांचा शोध घेतला असता ते बँकेतून पसार झाल्याचे आढळले.  या प्रकरणी सतीश चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.