Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड
    क्राईम

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    editor deskBy editor deskDecember 13, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहरात सातत्याने घडत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोठी कारवाई करत एका आंतरराज्यीय अट्टल चोरट्याला अटक करून शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.

    जळगाव शहरात वाढलेल्या घरफोडी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील कुक्षी तालुक्यातील रहिवासी रमेश भुरूसिंग अनारे (वय २७) या आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेतले.

    चौकशीदरम्यान आरोपी रमेश अनारे याने जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या चार घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच या चोरीच्या घटनांमध्ये मध्यप्रदेशातील त्याचे पाच साथीदार – कुंद्या डावरीया, बरदान देवका, कालु डावरीया, राहुल डावरीया आणि सुनील परमाती – सहभागी असल्याची माहितीही त्याने दिली आहे.  आरोपी रमेश अनारे याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पुढील तपास करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे जळगाव शहरातील घरफोडीच्या घटनांचा छडा लागण्यास मदत होणार असून उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.