Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माणुसकीला काळीमा; अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणारा पोलिस फरार
    क्राईम

    माणुसकीला काळीमा; अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणारा पोलिस फरार

    editor deskBy editor deskDecember 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    मुंबईत पोलीस दलात कार्यरत असलेल्या मावस काकाने अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी तिचा गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित काका फरार झाला आहे. तर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावात आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मुंबई येथे पोलीस दलात असलेल्या तिच्या मावस काकाने मे व जून २०२५ मध्ये अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची कुणालाही वाच्यता केल्यास ‘तुला पोलिस होऊ देणार नाही’ अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

    ऑक्टोबर महिन्यात पीडित मुलीला उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर तिने आजीला माहिती दिली. त्यानंतर आजीने तिला पाचोरा येथे आणून सोनोग्राफी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडितेच्या आईच्या संमतीने संबंधित डॉक्टरने गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, पीडित मुलीने जळगाव येथील महिला दक्षता समितीला व्हॉट्सअॅप संदेश पाठवून मदतीची विनंती केली. समितीने तत्काळ पाचोरा पोलिसांना माहिती दिली. ८ डिसेंबर रोजी पीडितेला पाचोरा पोलीस ठाण्यात बोलावून तिच्याकडून रितसर फिर्याद नोंदवून घेण्यात आली. त्यानंतर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली असून मुख्य संशयित आरोपी फरार आहे.

    या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.