Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ८६ वर्षीय सेवानिवृत्ताची ८० लाखात फसवणूक !
    क्राईम

    ८६ वर्षीय सेवानिवृत्ताची ८० लाखात फसवणूक !

    editor deskBy editor deskDecember 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गोरगरिबांची फसवणूक, मनी लॉड्रिंग व अतिरेक्यांना पैसे दिले तसेच पॉर्नोग्राफी व्हिडीओ बघत असल्याने गुन्हा दाखल असल्याचे सांगत ८६ वर्षीय सेवानिवृत्ताची आर्थिक फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांनी पोलिसांच्या वेशात धमकावत ८० लाख पाच हजार ४१६ रुपये निवृत्ताकडून उकळले. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  महावितरणचे सेवानिवृत्त सुकदेव पांडुरंग चौधरी (८६, रा. भुसावळ) यांना २७ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून कॉल आला व डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगितले. आपल्या नावे बरेच बनावट फोन क्रमांक असून त्याद्वारे अनेकांची फसवणूक होत असल्याचे सांगितले. याबाबत फसवणूकप्रकरणी कुलाबा पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. २८ ऑक्टोबर रोजी पुन्हा सेवानिवृत्तास कॉल आला व पॉर्नोग्राफी व्हिडीओ बघत असल्याने तसेच अतिरेक्यांकडून पैसे घेत असल्याने गुन्हा दाखल असून यातून वाचण्यासाठी बँक खात्याची माहिती पाठविण्यास सांगितले. घाबरून निवृत्ताने ६ नोव्हेंबर रोजी ३८ लाख ९५ हजार २०८ रुपये, १० नोव्हेंबर रोजी २१ लाख १० हजार २०८ रुपये, ५ डिसेंबर रोजी २० लाख रुपये पाठविले. रक्कम पाठविल्यानंतर कॉल येणे बंद झाले.

    दरम्यान, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट देऊ, त्यासाठी तुमचे आधार कार्ड पाठवा, असेही सांगितले. त्यानुसार आधार कार्डचा फोटो मोबाइलवर पाठविला. मात्र, तुमच्या नावावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा असून त्यावरून दोन कोटींचा व्यवहार झाला असून ती रक्कम अतिरेक्यांना ट्रान्सफर झाल्याचे दिसत असल्याने हे सर्टिफिकेट देता येणार नसल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहाटेचा भीषण स्फोट : गॅस सिलिंडर फुटून महिलेचा होरपळून मृत्यू; ९ जणांना नागरिकांनी वाचवले !

    June 20, 2026

    कीर्तन सुरू असतानाच काळाचा घाला; यशवाडी देवस्थानात भीषण दुर्घटना

    June 20, 2026

    पहाटेचा पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ऑपरेशन ड्रॉप केसमध्ये ८ आरोपी जेरबंद, ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त !

    June 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.