वरणगाव : प्रतिनिधी
शहरातील एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवासी संजय हरी सुरवाडे (४६) यांनी सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घराच्या खिडकीच्या गजाला दोर बांधून गळफास घेतला. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत चुलतभाऊ विजय सुरवाडे यांच्या खबरीवरून पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉ. सुभाष सपकाळ करत आहेत.



