जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात महिला घरामध्ये झोपलेली असतांना मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास संशयित महिलेच्या घरात शिरला. त्याने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. ही घटना दि. ६ रोजी घडली. याप्रकरणी संशयित धनराज सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला वास्तव्यास आहे. दि. ६ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास झोपलेल्या होत्या. यावेळी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास संशयित धनराज सोनवणे हा अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरला. त्याने महिलेच्या अंगावर हात फिरवून तिच्या मनास लज्जा होईल असे कृत्य केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित धनराज सोनवणे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहे कॉ दिनेश चव्हाण हे करीत आहे



