Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बायपासवर भीषण अपघात; कार दोनदा उलटून थेट ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडक
    क्राईम

    बायपासवर भीषण अपघात; कार दोनदा उलटून थेट ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडक

    editor deskBy editor deskDecember 8, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    नशिराबादकडून पाळधीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा टायर अचानक फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन दोनदा उलटले व दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडकले. या विचित्र व भीषण अपघातात कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला असून कारमधील दोघे युवक-युवती गंभीर जखमी झाले. ही घटना रविवार, दि. ७ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास बायपासवरील आव्हाणे शिवारात घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहराबाहेरील बायपास मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याच मार्गावरून तरसोद फाट्याकडून (एमएच 19 EG 1878) क्रमांकाची कार पाळधीकडे जात होती. दरम्यान, अचानक टायर फुटल्याने वाहनाचा तोल सुटला व कार दोनदा उलटून दुभाजक ओलांडत पाळधीकडून तरसोदकडे जाणाऱ्या (CJ 07 BR 3717) क्रमांकाच्या ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर आदळली. अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे मोडून पडला. यात यश रमेश शिंपी (23, रा. पाळधी, ता. धरणगाव) व पल्लवी छाडीकर (20, रा. मेहरुण) हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांच्याही हाताला दुखापत झाली असून यश शिंपी यांच्या पायालाही गंभीर मार बसला आहे.

    अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रेलर चालकाची चौकशी करून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. मात्र या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात कोणतीही नोंद झाली नव्हती. बायपासवरील वाढत्या वाहनवेगामुळे अपघातांचे प्रमाण वाढू लागल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.