अमरावती : वृत्तसंस्था
राज्यातील अमरावती जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चांदूरबाजार तालुक्यात शिरजगाव बंड येथील सहा वर्षांच्या चिमुरडीवर ५५ वर्षीय विकृताने अत्याचार केल्याची संतापजनक घटना २ डिसेंबर रोजी घडली. ही धक्कादायक घटना शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजू मुल्ला उर्फ रियाजुद्दीन जहिरुद्दीन मुल्ला (वय ५६, रा. शिरजगाव बंड ) याने आपल्या घराशेजारी राहणार्या चिमुरडीला बिस्किट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी वीस रुपये देऊन तिला विश्वासात घेतले आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. शाळा परिसरात शांतता असल्याचा फायदा घेत हा घृणास्पद प्रकार घडवून आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे.
घटना समोर आल्यानंतर मुलीच्या आईने दि. ३ डिसेंबर रोजी चांदूरबाजार पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत बीएनएस कलम ६४ (१), ६५ (२) सह पोक्सो कलम ४, ६, १२ कायद्यान्वये आरोपीला अटक केली. ठाणेदार अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक विनोद इंगळे यांचा मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


