धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चोपडा रस्त्यावरील शासकीय आय टी आय जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारे १० किलोचा गांजा पकडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धरणगाव – चोपडा रस्त्यावरील शासकीय आय टी आय जवळ आज दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारे १० किलोचा गांजा पकडल्याची घटना घडली असून हि कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा राहुल गायकवाड यांच्या पथकातील धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील, सुधीर चौधरी, संदीप पाटील, किशोर भोई या पथकाने कारवाई केली. या प्रकरणी रात्री उशिरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
सविस्तर वृत्त लवकरच अपडेट होणार….तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र न्यूज


