नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना एक मोठी बातमी समोर आली. राज्य निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. अशातच आता मंगळवेढा नगरपरिषद, धाराशिव नगरपालिका आणि यवतमाळ नगपरिषद याबाबत अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.
मंगळवेढा नगरपरिषद : मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नगरपरिषदेची निवडणूक नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांमुळे अडकलेली होती. अखेर यावर निर्णय झाला असून आता 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या असून, राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
नवीन वेळापत्रकानुसार पुढीलप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.
4 डिसेंबर: जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
10 डिसेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत): नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम मुदत.
11 डिसेंबर: चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर.
20 डिसेंबर: मतदान.
21 डिसेंबर 2025: मतमोजणी.
23 डिसेंबरपूर्वी: संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी हा निर्णय जाहीर केला असून, सहआयुक्त योगेश डोके यांनीही या कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.
धाराशिव नगरपालिका: धाराशिव नगरपालिकेतील तीन जागांसाठी (प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब) अखेर सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी उशिरा जाहीर केला. त्यानुसार धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
‘असा’ आहे नवीन जाहीर करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम
4 डिसेंबर: जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
10 डिसेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत): नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम मुदत.
11 डिसेंबर: चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर.
20 डिसेंबर: मतदान.
21 डिसेंबर 2025: मतमोजणी.


