जळगाव : प्रतिनिधी
शहरातील अजिंठा चौक परिसरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास डंपरवरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात आणत दुचाकीला धडक दिली. या अपघातात मामासह त्यांची चार वर्षीय भाची गंभीररित्या जखमी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन शांताराम सुर्यवंशी (वय ३३, रा. गजानन पार्क, कुसुंबा) हे त्यांची भाची वैष्णवी वानखेडे (वय ४) हिला दुचाकीवर बसवून कुसुंबा येथुन शहरात येत होते. अजिंठा चौकातून दुचाकी जात असताना डंपर (एमएच १९ सीवाय ९३२५) वरील चालकाने भरधाव वेगात ताब्यातील वाहन आणत दुचाकीच्या उजव्या बाजुला जोराने धडक दिली. या अपघातात पवन सुर्यवंशी यांच्या दोन्ही पायांना तसेच कमरेला गंभीर दुखापत झाली. त्यांची भाची वैष्णवी हिच्या दोन्ही पायांना दुखापत झाली.


