जळगाव : लाइव महाराष्ट्र न्यूज
पारोळा नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात करण बाळासाहेब पवार यांनी केलेली कामे आजही जनतेच्या मनात घर करून राहिलेले आहे. मात्र प्रशासकाच्या काळात पारोळा शहराची पूर्णपणे वाट लागली व शिवसेना शिंदेने जे आहे ते सुद्धा सांभाळले नाही म्हणून निष्क्रिय ठरताना दिसत आहे करण पवार यांची लोकप्रियता वाढल्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजली करण पवार यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.
पदानी कितीही मोठा झाला माणूस पण शेवटी निष्क्रिय जर राहिला तर तो यशस्वी होऊ शकत नाही याची प्रचिती पारोळेकरांना सध्या होताना दिसत आहे. पैशाने मोठा होता येते परंतु कामाची झलक ही रक्तात असावी लागते. असो पारोळेकरांच्या उज्वल भविष्यासाठी आता जनतेने ठरवले असून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंजली करण पाटील यांना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. करण पवार हे पारोळाकरांच्या मनातले युवा स्थान आहे म्हणून जनतेच्या मनात आता लोकनियुक्त नगराध्यक्ष ठरला असून अंजली करण पाटील यांचे नाव चर्चेत आहे.


