नांदेड : वृत्तसंस्था
शिक्षकी पेक्षाला काळिमा फासणारी ही घटना असून नांदेडमध्ये दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतील शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीने शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर ही घटनासमोर आली. याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात संशयित ईशांत लोखंडे याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित चिमुकली ही शहरातील एका इंग्रजी माध्यमातील शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत होती. १९ नोव्हेंबरला ती नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आली. दुसऱ्यादिवशी आईने तिला सकाळी शाळेत जाण्यासाठी झोपेतून उठवले, पण तिने शाळेस जाण्यास नकार दिला. दोन ते तीन वेळेस आई-वडील तिला शाळेत जा म्हणत होते. तरीदेखील पीडितेने शाळेत जाण्यास नकार देत होती. शाळेत न जाण्याचे कारण पालकांनी विचारल्यावर चिमुकलीने घटना सांगितली. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांना धक्का बसला.तत्काळ मुलीच्या पालकांनी भाग्यनगर पोलिस ठाणे गाठत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. नराधम शिक्षक शाळेत गणित विषय शिकवायचा.अत्याचार करत त्याने मुलीला धमकावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. दरम्यान, पोलिसांनी संशयितालाताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


