धरणगाव : प्रतिनिधी
येथील पंचवार्षिक निवडणुकीी आज माघारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी ११ वार्डातील २३ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत.
येथे नगराध्य पदासाठी महायुतीचे महाराष्ट्र जन विकास आघाडीतर्फे वैशाली विनय भावे तर धरणगाव शहर विकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे लीलाबाई सुरेश चौधरी व अपक्ष सुनीता दिलीप महाले हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत महायुती विरोधात महाविकास आघाडीतच रंगण्याची चर्चा होत आहे. तसेच नगरसेवक पदासाठी ११ वार्डातून २३ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यात वार्ड १ धरणगाव शहर विकास आघाडी उषा वाघ, लक्ष्मण माळी, महाराष्ट्र जन विकास आघाडीतर्फे सुरेखा महाजन, अनिल महाजन, वार्ड २ महाराष्ट्र जनविकास आघाडी दीपक वाघमारे, आशाबाई महाजन, शहर विकास आघाडी प्रमिला शिरसाठ, भारती महाजन, वार्ड ३ महाराष्ट्र जन विकास आघाडीतर्फे विलास महाजन, कविता पाटील, शहर विकास आघाडी अनिता पाटील. अब्दल बशीर मोहम्मद सादिक, वार्ड ४ महाराष्ट्र विकास आघाडी मीना चौधरी, हाजी शेख इब्राहिम मोमीन, खान नसरीन बानू शब्बीर, अक्षय मुथा, वॉर्ड ५ महाराष्ट्र जनविकास आघाडी रूपाली देवरे, संजय महाजन, सूरेखा भोई, प्रकाश महाजन, वार्ड ६ महाराष्ट्र जनविकास आघाडी मंदाकिनी येवले, नितीन गजानन, संगीता मराठे, शुभम चौधरी, वार्ड ७ महाराष्ट्र जनविकास आघाडी अक्काबाई चव्हाण, कन्हैयालाल महाजन, शुभांगी पवार, नीलेश चौधरी, अपक्ष संजय माळी, वार्ड ८ महाराष्ट्र जनविकास आघाडी पूर्णिमा भाटिया, प्रवीण चौधरी, शहर विकास आघाडी ज्योती पाटील, सुनील चौधरी, वार्ड ९ महाराष्ट्र जनविकास आघाडी प्रियंका जाधव, किशोर कंखरे, विजया देशमुख, राजू न्हायदे, वॉर्ड १० महाराष्ट्र जीवन विकास आघाडीतर्फे गुलाब मराठे, अंजली विसावे, रियाज मोहम्मद फारूक बागवान, ज्योती महाजन, तर वॉर्ड ११मध्ये महाराष्ट्र जनविकास आघाडीतर्फे सोनाली कंखरे, सुरेखा वाघरे, तौसिफ पटेल, शहर विकास आघाडीतर्फे मंदा धनगर, हेमांगी अग्निहोत्री, खान फिरोज खान हमीद हे उमेदवार रिंगणात आहेत.



