धरणगाव : प्रतिनिधी
एरंडोल मॉर्निंग वॉक करणाऱ्या धरणगाव तहसील कार्यालयातील लिपिक शिवाजी रघुनाथ महाजन (४२, मूळ पारोळा, ह. मु. एरंडोल) यांना वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग हॉलसमोर गुरुवारी सकाळी घडली. क्रमांक ६वर येथील बैठक हॉलसमोर गुरुवारी सकाळी घडली.
शिवाजी महाजन हे धरणगाव तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. ते एरंडोलहून धरणगावला ये-जा करायचे. ते त्यांच्या मित्रांसोबत दररोज सकाळी पायी फिरायला जात असत नेहमीप्रमाणे ते एरंडोल-पारोळा महामार्गावर फिरायला गेले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने (एचआर३८/एडी४१३६) जागीच कोसळले. चालक डंपर त्यांना धडक दिल्याने ते सोडून पळून गेला.



