धरणगाव : प्रतिनिधी
शहरात निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून नगरपालिका सभागृहात आज अर्जाची छाननी करण्यात आली. यात नगराध्यक्ष पदासाठी दाखल २३ अर्जापैकी ११ अर्ज अवैध ठरलेत. तर १२ अर्ज वैध ठरले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी वैध अर्जामध्ये जान्हवी नीलेश चौधरी, रेखा भागवत चौधरी, लीलाबाई सुरेश चौधरी, वैशाली विनय भावे, चंद्रकला वसंतराव भोलाणे, पुष्पा ज्ञानेश्वर महाजन, मोनिका महेंद्र महाजन, सुनीता दिलीप महाले, ज्योती विनोद माळी, उषा गुलाबराव वाघ, रिता प्रथमेश सूर्यवंशी यांचा समावेश आहेत. तर माघारी नंतरच हे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, नगरसेवक पदासाठी २८७ अर्ज दाखल झाले होते. त्यातील २९ अर्ज अवैध ठरलेत तर २५८ अर्ज वैध ठरले आहेत.


