धरणगाव : प्रतिनिधी
शहरात दुचाकीला अडकवलेली १ लाख रुपये असलेली बॅग लंपास झाल्याची घटना उड्डाणपुलाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील भैय्यासाहेब नीळकंठ पाटील हे पेन्शनर आहेत. ते त्यांच्या पेन्शनची रक्कम काढण्यासाठी बँकेत आले होते. त्यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बँकेतून १ लाख रुपये रोख काढले. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे भाऊ रवींद्र निळकंठ भदाणे आणि स्वतः भैय्यासाहेब हे दोघेजण हेडगेवार नगरमध्ये जाण्यासाठी निघाले असता उड्डाणपूल जवळील पान सेंटरवर थांबले. त्याचवेळी एक अनोळखी जवळ येऊन त्याने तुमच्या दुचाकीच्या सीटवर काहीतरी पडल्याचे सांगितले. त्याचवेळेस त्यांनी त्यांच्या हातातील पैशांची पिशवी दुचाकीच्या स्टॅन्डला अडकवली व थोड्याच वेळात ती बॅग त्यात असलेले १ लाख रुपये रोख पैसे, मोबाइल, पासबुक असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.


