Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेची सोनपोत ओढून नेली !
    क्राईम

    दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेची सोनपोत ओढून नेली !

    editor deskBy editor deskNovember 19, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गेट टुगेदर’ कार्यक्रमाहून घराजवळ पोहोचल्यानंतर तेथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अनिता अरुण ढाके (४८, रा. अयोध्यानगर) यांच्या गळ्यातील आठ ग्रॅमची सोनपोत व १० ग्रॅमची सोन्याची चेन ओढून नेली. ही घटना रविवारी (दि. १६) अयोध्या नगरातील संजीवनी अपार्टमेंटजवळ घडली. एमआडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अयोध्या नगरातील अनिता ढाके या काशीबाई कोल्हे शाळेत येथे ‘गेट टुगेदर’च्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तेथून त्या मैत्रिणींकडे व त्यानंतर घरी पोहोचल्या. संजीवनी अपार्टमेंटजवळ पोहोचल्यानंतर दुचाकीवरून उतरत असताना दुचाकीवरून दोनजण आले. त्यातील एकाने महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची आठ ग्रॅमची सोनपोत आणि ५० हजार रुपयांची १० ग्रॅमची सोन्याची चेन ओढून चोरटा दुचाकीवरून पसार झाला. याप्रकरणी अनिता ढाके यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राहुल तायडे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू; मंदिर परिसरात घडली हृदयद्रावक घटना

    April 13, 2026

    ऑनलाईन रेटिंगच्या आमिषाने शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

    April 13, 2026

    शस्त्रसाठा जप्त: वरणगाव पोलिसांची धडक कारवाई, मध्यप्रदेशातून पुरवठादार अटकेत

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.