जळगाव : प्रतिनिधी
शहरातील देवीदास कॉलनीतील रहिवासी महेश भास्करराव सावदेकर (वय ५२) यांनी सोमवार दि.१७नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील देवीदास कॉलनीतील रहिवासी महेश सावदेकर हे एका महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कामाला होते. सोमवारी दुपारी त्यांच्या पत्नी यशोधरा सावदेकर या कामावर, तर मुलगा क्लासला गेलेला असतांना त्यांनी विषारी द्रव सेवन केले. शेजाऱ्यांनी याबाबत त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ अविनाश सावदेकर यांना माहिती दिली. ते तत्काळ घरी पोहचले व भावाला जीएमसीत दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यांना सेवेत कायम न करता दीड महिन्यांपूर्वी काढून टाकले गेल्याने ते तणावात होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा आरोपही त्यांनी केला आहे. पतीच्या आत्महत्येस जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
सावदेकर हे कामाच्या चिंतेने सतत तणावात राहत होते. त्यामुळे त्यांनी यापूर्वी २१ जून रोजीदेखील हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. महेश सावदेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी यशोधरा यांनी सांगितले की, ते अनेक वर्षांपासून एका प्रतिष्ठीत महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कामाला होते. त्यांना सेवेत कायम न करता दीड महिन्यांपूर्वी काढून टाकले गेल्याने ते तणावात होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा आरोपही त्यांनी केला आहे. पतीच्या आत्महत्येस जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


