जळगाव : विजय पाटील
राजकारणात एखाद्या गोष्टीचे लागलेले घाव किती माणूस जवळ आला तरी विसरू शकत नाही काही बाबतीत विसरतो परंतु प्रसंगी वेळ आली की बरोबर दाखवतो रंग असाच हिचा काहीसा पुढे आलेला आहे.
सर्वपक्षीय होऊ पाहत असलेले भुसावळचे विजू भाऊ यांना भाजपाकडून यावल व भुसावळ मध्ये उमेदवारी पाहिजे होती यावलमध्ये मुलीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष व मुलासाठी भुसावळमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवारी पाहिजे होती. परंतु जिल्हा बँक निवडणुकीत एका कागदाने संकट मोचकांचे सर्व राजकारण फेल झाले होते आणि ही जखम विसरून भाजपात संबंधित भुसावळचे भाऊ दाखल झाले परंतु जुने घाव मात्र संकटमोचक विसरू शकले नाही असे या राजकीय घडामोडी वरून दिसते असो खोलात जाणे उचित नाही. परंतु एकेकाळी घरात दोन दोन नगरसेवक असे मोठे साम्राज्य असलेले भाऊ आज पक्ष उमेदवारी द्यायला तयार नाही अशी स्थिती निर्माण झाले आहे मंत्री महोदयांनी देखील हातवरती केले आहे.
अशी परिस्थिती राजकारणात कधीही कुणावरही येऊ शकते. यावलच्या नगराध्यक्षांसाठी भाजपाच्या मुंबईचे नेत्याकडून नाव आले होते परंतु ते देखील फेल झाले त्यानंतर जळगावच्या प्रत्येक ठिकाणी मीच असा तथागतीत हनुमान यांनी सुपारी घेतली होती परंतु ती सुपारी देखील फेल झालेली आहे असे राजकीय चित्र दिसून येत आहे.


