जळगाव : विजय पाटील
वरणगावपाटोपाठ मुक्ताईनगर नगरपालिकेत देखील मोठी राजकीय खेडी खेळली गेली आमदाराला रोखण्यासाठी मुक्ताईनगरच्या फार्म हाऊस वरून सूत्र हालले आणि तुतारी ऐवजी कमळ या चिन्हावर सर्व उमेदवार देण्याच्या निर्णय झाला आता मुक्ताईनगर मध्ये तुतारी नसून कमळ फुलणार आहे.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर शहरात तुतारीने 828 मतांनी आघाडी घेतली होती आमदार चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर शहरात मागे होते असे असताना तुतारीचे वजन नाही संघटन नाही म्हणून राजकीय खेळी खेळून तुतारी ऐवजी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सर्व सूत्रे हे सुनेकडे सोपवले गेले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी मोठ्या राजकीय ठेकेदाराच्या मुलीचे नाव पुढे केले गेले तोही फार्म हाऊसचा प्यादा आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे थेट विरोध करू शकत नाही आणि काही बोलूही शकत नाही अशी परिस्थिती भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांची झाली आहे. वरणगाव मध्ये देखील काळे यांचा राजकीय गेम असाच केला गेला आता सर्व सूत्रे हे मुक्ताईनगर नगरपालिकेसाठी फार्म हाऊस वरून भाजपाचे सूत्रे आलती एवढे मात्र निश्चित.


