चाळीसगाव : प्रतिनिधी
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रचार वेग घेत असून, आज प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रचार दौरा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हनुमान मंदिर, नेताजी पालकर चौक येथून सुरुवात झालेल्या या प्रचार यात्रेत इंदिरानगर, स्नेह श्रीराम अपार्टमेंट, फुले कॉलनी, मिसाळ गल्ली, छायाप्रकाश स्टुडिओ परिसर, वसंत डेअरी निवासस्थान, कोयल कृपा, छत्रपती शिवाजी चौक, गणेश रोड, गणपती मंदिर, डॉ. सी. टी. पवार दवाखाना, उन्नती मंडळ आणि बलराम शाळा मैदान येथे कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
या दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा हा मंगेशदादांच्या सर्वसमावेशक विकासाच्या व्हिजनला बळ देणारा असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रभागातील नागरिकांनी विविध प्रश्न मांडत विकासाभिमुख नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली.


