चाळीसगाव : प्रतिनिधी
रस्त्याच्या कडेला उभे राहून रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना अश्लिल हावभाव व इशारा करणऱ्या चार महिलांवर चाळीसगाव शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी २.५५ वाजेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईने खळबळ उडाली असून नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. अमितकुमार मनेळ यांना, शहरातील गुजरी पुलाजवळील भाजीपाला मार्केटजवळ रस्त्याच्या कडेला काहि महिला उभ्या राहून अशलिल हावभाव व इशारे करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश दिले. महिला पो.कॉ. स्नेहल मांडोळे, अनिता सुरवाडे, सबा शेख, म.पो.ना. मालती बच्छाव, हवालदार विनोद पाटील, पो.कॉ. रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर पाटोळे, कल्पेश पगारे यांच्या पथकाने तेथे धाव घेतली. त्यावेळी काहि महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहून ये-जा करणाऱ्यांना अशिलिल हावभाव करून इशारे करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या चार महिलांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. पो.कॉ. सबा शेख यांच्या फिर्यादीवरून त्या चार महिलांविरोधात वेगवेगळ्या कलमांप्रमाणे कारवाई करण्यात आली. तपास हवालदार दत्तात्रय महाजन करत आहेत.


