जळगाव : प्रतिनिधी
कंपनीतून रक्कम घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला मोबाइलवर बोलण्यासाठी थांबलेल्या कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लांबविली. ही घटना शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) सायंकाळी वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील रेमंड चौकाच्या पुढे बीएचआर पतसंस्थेच्या कार्यालयाजवळ घडली. सात याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसीतील तेलाच्या कंपनीतून सायंकाळी १० लाख रुपयांचे पेमेंट घेऊन एक कुरीयर बॉय जुने बसस्थानक परिसरात दुचाकीने जात होता. त्याच्या मालकाने त्याला कॉल केला व कुरीयर बॉय बोलण्यासाठी रस्त्याच्याकडेला थांबला. यावेळी दुचाकीवर दोन जण तेथे आले व त्यांनी कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून दुचाकीला लावलेली रोकडची पिशवी घेवून चोरटे छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने पसार झाले. याविषयी माहिती मिळाल्यानंतर एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड हे पथकासह घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती घेतली. पथकाकडून कुरीयर बॉयची चौकशी करण्यासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेची तपासणी सुरू करण्यात आली


