यावल : प्रतिनिधी
साकळी येथील डॉ. आंबेडकर नगरातील रहिवाशी एका ११ वर्षीय बालकाला शिरसाड येथील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी आपल्या सोबत बसवून नेले व त्याला दारू पाजली. त्यामुळे हा बालक अस्वस्थ झाल्याने ट्रॅक्टर चालकांनी त्याला सोडून पळ काढला. बालकाला नागरिकांनी त्याच्या घरी पोहोचवले दरम्यान हा बालक बेशुद्ध पडल्यामुळे कुटुंबाकडून त्याला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याबाबत बालकाच्या पालकांनी यावल पोलिसात तक्रार दिली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, साकळी ता. यावल या गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात बालक बुधवारी सकाळी होता. आपल्या घराच्या बाहेर खेळत दरम्यान शिरसाड या गावातील वाळू वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टर चालकांनी या बालकाला आपल्यासोबत नेले. व त्याला त्यांनी दारू पाजली. या बालकाला दारू पाजल्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि बेशुद्ध पडला. तेव्हा त्याला सोडून हा ट्रॅक्टर चालकांनी पळ काढला. नागरिकांनी या बालकाला पाहिले असता त्याला तातडीने त्याच्या घरी पोहोचवले. बालक अस्वस्थ असल्यामुळे त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारा करीता आणण्यात आले. बालक सध्या अस्वस्थ असून, त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, अधिपरिचारिका आरती कोल्हे यांच्या वतीने उपचार सुरू आहे. याप्रकरणी या बालकाच्या पालकांकडून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.


