लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव येथील महापालिकेतही सत्तासंघर्ष होऊन शिंदे गटाने भाजपमधून 27 नगरसेवकांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी हात पुढे दिला. त्यामुळे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली. पाठिंबा देणार्या सहा नगरसेवकांनी आता शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर महाराष्ट्रातून जळगावातील नगरसेवकांची ही पहिलीच फाटाफूट आहे. ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या समवेत अंबरनाथ येथील नगरसेवक सुनील चौधरीदेखील उपस्थित होते.
आणखी नगरसेवक संपर्कात नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सांगितले की, आम्ही भाजपतून बाहेर पडलो, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. आज सहा नगरसेवक असलो तरी फुटीर गटासह अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


