भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील खडका चौफुली ते इदगाह मैदान या रस्त्यावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान बुधवारी सकाळी एका खडीने भरलेला डंपर कलंडला आहे.
रस्त्याच्या एका बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, दुसऱ्या बाजूचे काम सुरू आहे. याच भागात खडी टाकण्यासाठी डंपर आणण्यात आला होता. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या सांडपाण्याच्या नाल्यामुळे डंपर कलंडला आणि त्याची एक बाजू कलंडल्याने वाहन अडकले. या घटनेनंतर क्रेनच्या साहाय्याने डंपर बाजूला करण्यात आले. सुदैवाने घटनेत हानी झाली नाही.


