यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव खुर्द येथील पाण्याच्या टाकीजवळ काही जण जुगार खेळत होते. ही माहिती पो. नि. रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत १५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव खुर्द येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरात दीपक भोई, शांताराम पाटील, सलीम मुसलमान, शेख जाबीर, शिवाजी पाटील, नितीन वराडे, शशिकांत पाटील, भागवत पाटील, अंकुश कोळी, सुभाष महाजन, साहेबराव साळुंखे, वासुदेव वराडे, रवींद्र पाटील, दिलीप वंजारी, सुनील पाटील हे १५ जण जुगार खेळत होते. ही माहिती पो.नि. रंगनाथ धारबळे यांना मिळाली. यानंतर पो.नि. धरबळे यांनी पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पाठवले.
या पथकाने या १५ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा असा ३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून त्या १५ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात हवालदार संदीप सूर्यवंशी करत आहेत.


