जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पोलीस दल आता अनेक कारवाई करीत असताना आता मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी व लालगोटा भागात विविध आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळी कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कोम्बिंग राबवत १५ संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यातील दोन आरोपी दरोडासह लुटीच्या गुन्ह्यात पोलिसांना आधीच हवे असल्याने त्यांना अटक करण्यात आली तर अन्य १३ आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक मुक्ताईनगर पोलिसांच्या माध्यमातून कोम्बिंग राबवण्यात आले. कमलेश्वर ज्ञानेश्वर पाटील (वय ४५) व दीपमाला कमलेश पाटील (३८, दोघेही रा. मधापुरी) यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसांत आधीच गुन्हा दाखल होता. ते फरार असल्याने त्यांना अटक करण्यात आली. तसेच १३ संशयितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मधापुरी येथील रोहित ऊर्फ गुरुदास सुदेश पवार (२५), क्रिश निशांत पवार (१९), किसन दिनू पवार (२१), नितेश रितेश पवार (३०), आर्यमन जिन्नू पवार (१९), गीता नागेश पवार (३८) तसेच लालगोटा येथील धरमसिंग लखनसिंग भोसले (२५), लखनसिंग युवराज भोसले (५०), बाबूसिंग लखनसिंग भोसले (१९), टोनी दर्शनलाल पवार (४३), लकी टोनी पवार (२२) व सदानंद टोनी पवार (२५) तसेच हलखेडा येथील नयन सटा भोसले (२५) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलिस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक १३० पोलिस अंमलदार व चार आरसीपी पथके सहभागी झाली.
———————–


