Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिपीएस मित्र परिवार च्या स्तुत्य उपक्रमाने पाळधीकर भारावले
    धरणगाव

    जिपीएस मित्र परिवार च्या स्तुत्य उपक्रमाने पाळधीकर भारावले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 8, 2025Updated:November 8, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिपीएस मित्र परिवार गेल्या 3 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत असतो या मध्ये थंडीच्या दिवसात निराधार लोकांसाठी उबदार कपडे वाटप तसेच अन्नविना कोणीही भुके राहु नये या साठी दररोज 200 लोकांसाठी भोजन ची सोय,अपंग बांधवांना तीनचाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप,10 वी12वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा गुरुजन सन्मान सोहळा संत भोजन,जिल्ह्यातील सर्वात मोठा कीर्तन सप्ताह असे अनेक उपक्रम राबविले महत्वाचे म्हणजे पाळधी शहरात कुठेही कोणाच्या घरी दुःखद घटना घडली त्या साठी स्नेहाची शिदोरी पाठविण्यात येते ,,मित्र परिवार चा एक सदस्य सोडून गेला असता त्याच्या प्रथम पुण्यस्मरण निमीत्त पाळधी येथील स्मशानभूमी दत्तक घेऊन समशनभूमीचे सुशोभीकरण करीत तेथे त्याची आठवण म्हणून एक लहान बगीचा तयार करीत आहे अश्या या उपक्रमात भर म्हणून मित्र परिवार ने आज एक अनोखा कार्यक्रम घेऊन समाजामध्ये एक आदर्श निर्माण करीत पाळधी शहरात कोणाच्याही घरी दुःखद घटना घडल्यास त्या साठी त्या परिवार ला मदत म्हणून 2 मंडप, चटई,5 पाणी जार 2 चहा थर्मास,40 खुर्ची तसेच भोजन पट्टी असे साहित्य जिपीएस मित्र परिवार तर्फे देण्यात येणार असून उद्देश एकाच आहे की आपण समोरच्याच्या दुःखात सहभागी असणे हा आहे हा नवीन उपक्रम चा आज लोकार्पण सोहळा पार पडला हा सोहळा पार पडत असताना अनेकांचे डोळे पाणावले होते अश्या या सामाजिक उपक्रम साठी मा ना गुलाबराव पाटील साहेब मा जि प सदस्य प्रतापराव पाटील युवा उद्योजक विक्रम पाटील यांचे नेहमी सहकार्य लाभत असते आज या कार्यक्रम साठी पाळधी शहरातील जेष्ठ मंडळी शरद काका कासट कृष्णासा बिचवे,पंढरीनाथ ठाकूर भिला अप्पा रोकडे अजीज मणियार सर फुलपगारदादा देवरे दादा माजी सभापती संजय पाटील सरपंच विजय पाटील शरद कोळी दिनेश जोशी बाबा यांच्या सह पत्रकार बांधव महेश बाबा झंवर संजू भैया देशमुख गोपाळ सोनवणे दीपक झंवर उपस्थित होते या वेळी श्रीराम जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती शरद काका कासट यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की पाळधी स्मशानभूमीत अंत्यविधी साठी लागणारे गाय च्या शेणाची गवरी ते  स्वतः स्व खर्चाने उपलब्ध करून देणार आहे व त्या साठी एक शेड पण उभारून देणार आहे अश्या या अनोख्या कार्यक्रम ची चर्चा परिसरात होत असून त्याचे कौतुक होत आहे कार्यक्रम साठी जिपीएस मित्र परिवार च्या सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम संपन्न केला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगाव नगरपरिषद निवडणुकीला उत्साह : २३ जागांसाठी १८८ अर्जांची विक्री !

    November 13, 2025

    मध्यरात्री रस्त्यावर चार अज्ञातांनी ठेकेदाराला मारहाण करून तीस हजार रुपये लुटले !

    November 13, 2025

    जळगाव पोलिसांचा ‘स्पेशल ड्राइव्ह’ : अवैध धंदेवाल्यांवर दंडुका !

    November 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.