चोपडा : प्रतिनिधी
दोन आठवडद्यावर येऊन ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे (श.प.) माजी नगराध्यक्षा मनीषा चौधरी व पती गट नेते जीवन चौधरी, मुलगी साधना चौधरी, माजी जि प सदस्या सह माजी नगरसेवकी व पदाधिकारी यांनी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते जळगाव येथे भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार मंगेश चव्हाण, अमोल जावळे, राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा जिल्हा दुध संघाचे संचालक रोहित निकम, आ.राजुमामा भोळे, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्षा मनीषा चौधरी या मागील पालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या व त्या मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते तर पती जीवन चौधरी हे देखील तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते परंतु यंदा मात्र दोघी पती-पत्नीने सह माजी नगरसेविका दिपाली चौधरी यांनी नगरपालिकेच्या तोंडावर भाजपाने गळाला लावल्याने राष्ट्रवादीला धक्का तर भाजपला मोठा फायदा झाला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या आघाडीच्या उमेदवार म्हणून जीवन चौधरी यांची मुलगी साधना चौधरी ही निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटातील मोठ्या संख्येने पहिला फळीतील नेते व कार्यकर्ते हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरात अजित पवार गटाची ताकद वाढणार असल्याचेही चर्चा रंगू लागली आहे. तर काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
चोपडा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यानुसार माजी नगराध्यक्षा मनीषा चौधरी व गटनेते जीवन चौधरी यांची मुलगी सौ साधना चौधरी ह्या भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार असल्याची दाट शक्यता आहे. त्यानुसारच मनिषा चौधरी व जीवन चौधरी यांनी भाजपात प्रवेश केला असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या एकमेव माजी जि प सदस्या नीलिमा पाटील, माजी नगरसेविका दीपाली चौधरी, अनिता शिरसाठ, कृष्णा पवार, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र देशमुख, माजी नगरसेवक सीताराम पारधी, अॅड रुपेश पाटील यास अनेक पदाधिकारी व कार्यकत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. गेल्या दोन महिन्यात तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठी गळती लागली असून यापूर्वी मोठ्या संख्येने माजी पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आज मोठ्या संख्येने कार्यकत्यांसह शहरातील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेविका व माजी जि प सदस्य या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडले असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मोठा संघर्ष राष्ट्रवादीला करावा लागेल अशी चिन्ह दिसून येत आहे.


