जळगाव : प्रतिनिधी
कंटरेनरच्या धडकेत दोघ दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले. त्यातील प्रकाश चव्हाण याचा हात कंटेनरच्या चाकाखाली दबून तो गंभीर जखमी झाला. ही घटना दि. ४ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ममता बेकरीजवळील रस्त्यावर घडली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील मोरझिरा येथील रहिवासी सुनिल उदल राठोड (वय ३०) हे त्यांचा मित्र प्रताप राजाराम चव्हाण हे कुसुंबा येथून (एमएच १९, सीसी ४८०४) क्रमांकाच्या दुचाकीने ममता बेकरीजवळून जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (टीएन ८८, एल ७१११) क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना धडक दिली. यामध्ये दोघ दुचाकीस्वार हे रस्त्यावर कोसळले. यामधील प्रकाश चव्हाण याचा उजवा हात कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्याच्या दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सुनिल राठोड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना हेमंत जाधव हे करीत आहे.


