धरणगाव : प्रतिनिधी
येथील पक्षाचे निष्ठावंत शिलेदार तथा कॉन्ट्रॅक्टर मोहीत प्रकाश पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष (जळगाव लोकसभा क्षेत्र) पदी नियुक्ती करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई येथील बॅलाड इस्टेट परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या हस्ते पक्षाचे निष्ठावंत शिलेदार तथा कॉन्ट्रॅक्टर मोहीत प्रकाश पवार यांची जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष (जळगाव लोकसभा क्षेत्र) पदी नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते शिवराज बांगर, जळगाव युवक अध्यक्ष विश्वजित पाटील उपस्थित होते. युवकांचे संघटन मजबूत व्हावे या उद्देशाने विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तत्पूर्वी झालेल्या मिटिंगमध्ये उपस्थित युवकांना संबोधित करतांना मेहबुब शेख यांनी सांगितले की, सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे, शेतकरी ओल्या दुष्काळाने होरपळून निघाला आहे. अशा अवस्थेत शेतकरी – कष्टकरी, बेरोजगार, वंचित – उपेक्षित, महिला आदी प्रश्नांवर जागृती निर्माण करा आणि युवकांना पक्षाची विचारधारा व साहेबांचा विचार समजावून सांगा, असे आवाहन श्री शेख यांनी केले. यासोबतच भुसावळचे जयेश संतोष चौधरी यांची प्रदेश युवक सरचिटणीस पदी तसेच चोपडा तालुक्यातील मितावलीचे दिपक गुजर यांची जिल्हा युवक कार्याध्यक्ष (रावेर लोकसभा क्षेत्र) पदावर नियुक्तीचे अधिकृत पत्र देण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, माजी आमदार बी एस पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा निरिक्षक भास्करराव काळे, प्रदेश सरचिटणीस ॲड. रविंद्र पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलिक, रमेश पाटील, ललित बागुल, वाय एस महाजन, रमेश बारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. नियुक्ती पत्र स्वीकारतांना माजी युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सोनवदचे माजी सरपंच उज्वल पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, पक्षाचे पदाधिकारी भगवान शिंदे, अमित शिंदे, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, युवक अध्यक्ष परेश गुजर, पिंपळ्याचे गणेश पाटील आदी उपस्थित होते.


