धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील शेतकरी गटातर्फे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसानभरपाई व रब्बी हंगामपूर्व अनुदान तात्काळ वितरित करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार तथा कृषी अधिकारी, धरणगाव यांना प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बागायती आणि कोरडवाहू शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने एनडीआरएफ अंतर्गत दोन हेक्टरपर्यंत ₹18,500 आणि राज्य शासनाच्या जाहीर योजनेनुसार तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याची तरतूद केली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना केवळ अर्धीच रक्कम मिळाली असून प्रति गुंठा फक्त ₹40 इतकी मदत मिळत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये पिक आणेवारी तातडीने जाहीर करणे, पीकविमा मुदतवाढ देणे, रब्बी हंगामासाठी ₹10,000 अनुदान तात्काळ वितरित करणे आणि मका, सोयाबीन व कापूस पिकांसाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करणे या मुद्द्यांचा समावेश आहे. या निवेदनासाठी विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतखेडे येथील: डॉ. संदीप पाटील, प्रदीप पाटील, रमाकांत पाटील, डॉ. मुकेश पाटील, मोतीलाल पाटील, मंगल तुमडू पाटील, शरद पाटील, गजानन पाटील. बोरखेडा येथील: सुनील श्रीराम पाटील, गोपाल रघुनाथ चौधरी. पिंपरी येथील: संदीप मनोरे, शांताराम धनगर, राजेंद्र भिका मनुरे, नितीन धनगर, अनिल मनुरे. भोद येथील: दिनकर साहेबराव पाटील, छोटू आत्माराम पाटील. अहिरे येथील: मोतीलाल विठ्ठल पाटील.
अंजनविरे येथील: संदीप अशोक चव्हाण, महिंद्र गोकुळ पाटील, गणेश कांत चव्हाण. सोनवद येथील: भटा भिका पाटील, अशोक आत्माराम पाटील. कल्याण येथील: प्रवीण साहेबराव पाटील. मुसळी येथील: सुरेश छोटू पांडे. अहिरे खुर्द-बुद्रुक येथील: संदीप तुळशीराम पाटील, मोतीलाल विठ्ठल पाटील. वाकटुकी येथील: दिनकर शिवलाल पाटील. कल्याणी खुर्द येथील: अनिल महादू पाटील, प्रांजल पाटील. महेंद्रसिंग पाटील पष्टाने येथील: भागवत गंगाराम पाटील. निंभोरा येथील: विलास पुंडलिक पाटील. झुरखेडा येथील: किरण निंबा चौधरी, ज्ञानेश्वर रामसिंग चौधरी, गुलाब छगन पाटील, विजय ज्ञानेश्वर चौधरी.
या सर्व शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकजूट दाखवली. शासनाने पारदर्शक आणि तातडीने मदत वितरित केल्यास शेतकऱ्यांना सध्याच्या संकटातून दिलासा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आदर्श शेतकरी गटाच्या वतीने सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


