मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अभिनेते व अभिनेत्या नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असतात आता सध्या 90च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी आता अध्यात्माच्या वाटेवर चालत असून पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिच्या विधानाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. पण तिच्या विधानाने देशभरात खळबळ उडाली. उत्तर प्रदेशात असताना तिने दाऊद ईबराहीमबाबत असे काही स्टेटमेंट केले की प्रत्येकाच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. तिने बोलत बोलत दाऊद इब्राहीमला क्लीन चिट दिली. हे विधान सोशल मिडियावर व्हायरल होताच नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ममता म्हणते, ‘ दाऊद इब्राहीम आतंकवादी नव्हता. त्याने बॉम्ब ब्लास्ट केले नाहीत. तो आतंकवादी नाही. मुंबईत बॉम्बस्फोट कधी केले नाहीत.’ या विधानाच्या शेवटी तिने हे देखील सांगितले की ती दाऊदला प्रत्यक्षात कधीच भेटली नाही. पुढे ती म्हणते की, आता ती पूर्णपणे अध्यात्माच्या रस्त्यावर आहे. राजकारण आणि सिनेमाशी तिचा काहीच संबंध नाही.
1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणून दाऊद ईबराहीमचे नाव समोर आले आहे. याशिवाय तो अजूनही भारताच्या मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्यांच्या यादीत आहे. ममताचे हे विधान ऐकून सोशल मिडियावर मात्र नाराजी आणि राग व्यक्त केला आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता. सीबीआय आणि एनआयएच्या रिपोर्टनुसार दाऊद मास्टरमाइंड होता . सध्या तो फरार आहे. ममताच्या विधानाने भारतीय न्यायपालिका, सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तहेर यंत्रणा यांच्या तपासाला आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.


