जळगाव : प्रतिनिधी
एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागातील महिला कर्मचारी वैशाली गायकवाड, दुसरा कर्मचारी आणि श्रीकृष्ण वखारमालक सुनील धोबी, अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, यापैकी गायकवाड व धोबी यांना अटक करण्यात आली आहे. सुनील धोबी याने तक्रारदाराची लिंबाची झाडे तोडून भरलेला ट्रक बेकायदेशीर लाकूड वाहतूक केल्यामुळे पकडला होता. तो ट्रक सोडवण्यासाठी अडीच लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये लाचेची रक्कम ठरली. याबाबत आरोपींनी तक्रारदारांसोबत तडजोड झालेली रक्कम मान्य असल्याची कबुली दिली. त्यावरून पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक नेहा तुषार सुर्यवंशी यांच्या पथकाने केली. पथकात सपोउपनि दिनेशसिंग पाटील, पोना राकेश दुसाणे, पोना बाळू मराठे (जळगाव), पोहवा विनोद चौधरी, चापोहवा परशुराम जाधव (नाशिक), पोहवा नरेंद्र पाटील आणि पोना सुभाष पावरा (नंदुरबार) यांचा समावेश होता. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


