Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साईभक्तांच्या फॉर्च्युनरचा भीषण अपघात : तीन ठार, चार गंभीर जखमी
    क्राईम

    साईभक्तांच्या फॉर्च्युनरचा भीषण अपघात : तीन ठार, चार गंभीर जखमी

    editor deskBy editor deskOctober 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

     शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात असलेल्या साईभक्तांच्या फॉर्च्युनर गाडीचा आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात येवला तालुक्यातील एरंडगाव रायते शिवार परिसरात झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी सुरतवरून शिर्डीकडे जात होती. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनरने दोन ते तीन पलट्या मारल्या. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पुढील व मागील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र त्यापैकी एकाने मार्गातच प्राण सोडला. त्यामुळे मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे.  उर्वरित चार जखमींवर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

    अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघाताचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून वाहनाची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे.

    प्राथमिक माहितीनुसार, वाहन अतिवेगाने चालवले जात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अपघातस्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मागवण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या रस्त्यावरील धोकादायक वळणांवर चेतावणी फलक आणि स्पीडब्रेकर्स बसवण्याची मागणी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २४२ बक्षिसांची कमाई; राष्ट्रपती सन्मानाने गौरवले संजय शेलार

    January 25, 2026

    गावकुसाबाहेर डिजिटल पाऊल; पंचायतींसाठी ‘पंचम’ चॅटबॉट लाँच

    January 25, 2026

    पद्मश्री जाहीर: महाराष्ट्राच्या भूमीतील कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान

    January 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.