Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बसचे टायर फुटले अन महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू !
    क्राईम

    बसचे टायर फुटले अन महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव – भुसावळ महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमळनेर आगाराची बस जळगावकडून भुसावळकडे जात असताना हा अपघात झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, बस नशिराबाद टोल नाक्याजवळून जात असताना अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर भरधाव वेगात फुटले. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरकटलेली बस थेट टोल नाक्याजवळील एका भिंतीवर जाऊन आदळली. या अपघाताच्या धक्क्याने बसमध्ये बसलेली एक महिला प्रवासी खिडकीतून बाहेर फेकली गेली. दुर्दैवाने, ती महिला बसच्या मागील चाकाखाली आली आणि चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. साराबाई गणेश भोई (वय ४६) रा. पाडळसा ता.यावल असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

    अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि टोल नाक्याजवळील वाहनधारकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदत कार्य आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.