जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील विटनेर येथील शिवदास रामा पाटील वय ३४ वर्षे या तरूणाने रात्री १०वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेतला ही घटना घरच्यांच्या लक्ष्यात आल्यावर त्यांनी १२:३० वाजता जळगाव जिल्हा रुग्णालयात मयत स्थितीत दाखल केले होते .शिवदास पाटील यांच्यावर आज २६ रोजी दुपारी २:३०वाजता विटनेर येथे अंतसंस्कार करण्यात आले.
मयत शिवदास पाटील हे आई,पत्नी व दोन मुलांसह राहत होते यांच्याकडे तीन ते चार एकर शेतजमीन असून ते शेती करून आपल्या परीवाराचे पालन पोषण करत होते या वर्षी त्यांनी शेतात कापूस या पिकाची लागवड केली होती मात्र सततच्या पावसामुळे शेतातील कापसाचे पीक खराब झाल्याने ते नैराश्यात होते त्यातुन त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी एम.आय.डि.सी.पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे पुढील तपास पो.हे.कॅा.किरण पाटील हे करीत आहेत .


