Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ब्रेकिंग : रील बनवण्याचा मोह ठरला जीवघेणा! पाळधीजवळ रेल्वेखाली चिरडून दोन शाळकरी तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
    क्राईम

    ब्रेकिंग : रील बनवण्याचा मोह ठरला जीवघेणा! पाळधीजवळ रेल्वेखाली चिरडून दोन शाळकरी तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 26, 2025Updated:October 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव प्रतिनिधी : मोबाईलवर व्हिडिओ (रील) बनवण्याचा मोह दोन शाळकरी मित्रांसाठी जीवघेणा ठरल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी 25 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ घडली आहे. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने धडक दिल्याने या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.


    या भीषण अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार (वय १८ वर्षे) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय १८ वर्षे) अशी आहेत. दोघेही पाळधी येथील महात्मा फुले नगर, प्लॉट भाग (रेल्वे गेट जवळील प्लॉट) येथील रहिवासी होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ रेल्वे ट्रॅकवर मोबाईलवरील लोकप्रिय ॲपसाठी व्हिडिओ (रील) तयार करत होते. यावेळी धरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस गाडीची त्यांना धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निष्काळजीपणामुळे व साहसी कृत्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
    या घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे पाळधी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, तरुणांमध्ये वाढणाऱ्या धोकादायक ‘रील’ बनवण्याच्या प्रवृत्तीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026

    विम्यासाठी अपघाताचा रचला बनाव : वैद्यकीय अधिकाऱ्यासह ८ जणांना अटक !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.