भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील बसस्थानक रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र (ए.टी.सी.) समोर २२ रोजी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान पाच वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावून मुलीचीप सुटका केली. याबाबत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासात आरोपी गोरेलाल भगवानसिंग कछवे असल्याचे निष्पन्न झाले.
भुसावळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस उजनी देवस्थान (ता. बोदवड) येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मुलीला सुरक्षितपणे शोधत आई – वडिलांच्या स्वाधीन केले. आरोपीवर यापूर्वीही चैनपूर पोलिस स्टेशन (जि. खरगोन, म. प्र.) येथे अपहरणाचा गुन्हा करण्यात आल्याचे तपासात निषन्न झाले आहे. पराग सपकाळे या होमगॉर्डला ही बालिका आढळली. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
या मोहिमेत एपीआय नितीन पाटील, पो.उप.नि. मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, कांतीलाल केदारे, रवींद्र भावसार, योगेश माळी, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, अमर अढाळे, जावेद शहा, हर्षल महाजन, जीवन कापडे, योगेश महाजन, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, मोहसीन शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उपनिरी. रवींद्र नरवाडे, पोहेकॉ. उमाकांत पाटील, अक्रम शेख, गोपाल गव्हाळे, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, राहुल रगडे आर्दीचा समावेश होता.


