जळगाव : प्रतिनिधी
रस्त्याने पायी घराकडे निघालेल्या सुनंदा सुधीर महाजन (वय ६५, रा. श्रीकृष्ण कॉलनी) यांच्या गळ्यातून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ९५ हजारांच्या तीन तोळ्याची सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरुन नेले. ही घटना दि. २० रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास श्रीकृष्ण कॉलनीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कृष्ण कॉलनीत सुनंदा सुधीर महाजन या वास्तव्यास असून दि. २० रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांची जाऊ रेखा महाजन, सून स्वाती महाजन, नात काव्या यांच्यासोबत भुसावळला गेले होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते भुसावळातून जळगाव बस स्थानकावर आल्या. रिक्षाने त्या श्रीकृष्ण कॉलनीत जाण्याकरीता निघाले. गणेश कॉलनीतील दत्त मंदिराजवळ रिक्षातून उतरुन घराकडे पायी जात असतांना समोरुन दोन दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले.
त्या चोरट्यांनी वृद्ध सुनंदा महाजन यांच्या गळ्यातून ५५ हजार रुपये किंमतीची दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र व ४० हजारांचे एक तोळ्याची चैन असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. वृद्ध महिलेने आरडाओरड केली, मात्र चोरटे गणेश कॉलनीच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, वृद्ध महिलेने जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


