छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार पक्षाचे मंत्री छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर असून त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो, मंत्री मंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर, मग मंत्रिमंडळात का रहावे, असा प्रश्न उपस्थित करत राजीनामा देण्याचे शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सूचवले आहे.
भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा तिटकारा आहे, तर त्यांनी मंत्रिमंडळात गेल नाही पाहिजे, तिकडे ढुंकूनही नाही पाहिले पाहिजे. यामागे राज्य सरकार तर खेळ करत नाही का?, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यातील नेतृत्व करणाऱ्या लोकांचा उद्देश दिसतो.
कारण, सदन घोटाळ्याचे मोठे मोठे भाषण हे देवेंद्र फडणवीस यांनी केले, त्यांना जेलमध्ये भाजपने टाकले. याच भाजपच्या कृपेने ते जामिनावर आहेत. जामीन कधी ही रद्द होऊ शकतो, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाने नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या गाठीभेटी घेतल्या पाहिजे आणि प्रश्नांना उत्तरे द्यायला हवेत. विखे मनाने करतात असे काही नाही. विखे विखारी आहेत तर मग तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता ? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे. हे वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आहेत, कोणत्या बाजूने मत व्यक्त केले. बाजूने की विरोधात हे माहित नाही, राजकीय पक्षाचे लोक दोन्ही बाजू घेतात.
राजकीय पक्ष एकांगी बाजू घेत नाही. विजय वड्डेटीवार आणि भुजबळ खांद्याला खांदा आणि आणि गळ्यात गळा घालून बोलत होते, त्यांना ते आता वाईट वाटते त्याला काय करणार?, असेही दानवे यांनी म्हटले आहे.


