Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वेतून मोबाईल पडणाऱ्या चोरट्याला एलसीबीने घेतले ताब्यात !
    क्राईम

    रेल्वेतून मोबाईल पडणाऱ्या चोरट्याला एलसीबीने घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskOctober 17, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रेल्वेच्या दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोबाईल पाडणाऱ्या चोरट्याला एलसीबीने ताब्यात घेतले. त्याला कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतू पोलीसांकडून चौकशी सुरु असतांना कारवाईपुर्वीच पोलिसांच्या हातावर तूरी देवून चंद्रकांत दिलीप पाटील (रा. नंदुरबार) हा चोरटा पोलीस ठाण्यातून पसार झाला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांना समजताच पोलिसांनी पाठलाग करीत संशयिताला ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ माजून गेली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रेमनगराजवळ धावत्या रेल्वेच्या दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशाचा हाताला झटका मारुन संशयित चंद्रकांत पाटील याने मोबाईल पाडला. प्रवाशाने गाडी हळू झाल्यानंतर त्याने रेल्वेतून खाली उतरून चोरट्याचा पाठलाग सुरु केला. चोरटा पळून जात असतांना नागरिकांनी त्याला पकडून ठेवले. हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांना समजाच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेवून संशयित चोरट्याला ताब्यात घेतले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाईसाठी मोबाईल चोरट्याासह तक्रारदाराला जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आणि एलसीबीचे कर्मचारी तेथून निघून गेले. पोलीस तक्रारदाराची तक्रार ऐकून घेत असल्याचा फायदा घेत संशयित मोबाईल चोरटा चंद्रकांत पाटील हा पोलीस ठाण्यातून पसार झाला. ही बाब तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी पळून गेलेल्या संशयित चोरट्याचा शोध सुरु केला.

    पळून गेलेला चोरटा हा महाराणा प्रताप पुतळ्याजवळील बंद पडलेल्या पेट्रोलपंपाजवळील झाडाझुडपात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोधमोहीम राबवित संशयित मोबाईल चोरटा चंद्रकांत पाटील याला उचलून आणत त्याला पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कल्याण महामार्गावर मृत्यूचा थरार; भीषण धडकेत 11 जणांचा जागीच अंत

    April 13, 2026

    “दैवी अवतार”चा मुखवटा गळाला! अशोक खरात पोलिस कोठडीत गार !

    April 13, 2026

    चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू; मंदिर परिसरात घडली हृदयद्रावक घटना

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.